शांत मनाच्या डोहात
शांत मनाच्या डोहात गूढ अगम्य साचले काही कुणी पुसले नयन ओले कुणी बाण विखारी मारले काही संन्यस्त ऋषींच्या आश्रमी थबकाव अंतरीचा झाला पांथस्थ येता अवचित जीवनी जीवनाचा आलेख कळला ती मोहात गुंतली अलगद सीता का पेटून उठली पांचाली होमात धगधगले यज्ञकुंड ज्वाळानी समिधा दोघींच्या पडल्या त्यात अजूनही मुक्त कुठे न बाई आई सांगून जाते स्त्री मर्यादा […]