जावा प्रोग्रामिंग भाषेची पहिली आवृत्ती
जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM […]