लढा अथवा पळ काढा !
सध्याच्या २४x ७ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो… आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे. […]