सापळा (कथा)
माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात. […]
माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात. […]
दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते. […]
कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये. […]
आता जगण्याचा एकमेव आधार ओवी आहे. आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत. मी तुझ्या मुलीला तुझ्यासारखीच बनवीन समिधा हे माझं वचन आहे तुला. सात जन्माची साथ मागायचीस ना माझ्याकडून, आता पुढच्या जन्मी अशी घाई करु नकोस. […]
केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या पहिली लेडीज स्पेशल लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून गेली २८ वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय. […]
कोकीळ गातो गाणे चैत्राची चाहूल बाई कैऱ्यांच्या आडून दडणे तो दिसत द्वाड नाही हुरहूर उठवी जाणे कुजने अंगांग शहारे येई तो बोलावतो का कोणे साद पल्याड ऐकू येई तप्त धरणी आणि राने नकोशी कामावरची घाई वाटे झुलून हिंदोळ्याने थंड झुळूक शांतता देई पळस – बहाव्याचे सोने पानपानांवर बहरत जाई गूढ ग्रीष्म ऋतूचे येणे रानफळांची रेलचेल होई […]
प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो!! मनाला आनंदाने स्पर्शून जाणारा असतो! पाऊस कसा असतो ? घन भरुन आभाळी दाटून येतो. मेघातून किरणे सोडत सरीतून बरसतो!! प्रियकर प्रेयसीच्या डोळ्यांत चिंब भिजून असतो!! पाऊस सगळ्यांचा असतो. लहान,थोर स्त्री, पुरुष प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. पाऊस वेल्हाळ असतो. नवं तारुण्यातील युवतीला बेफाम बनवतो! स्त्रीला अवखळ बनवतो. निरागस बलिकेला अल्लल्ड बनवतो!! पाऊस तन […]
फिनोलेक्स केबल्स लि. कंपनीची मुहूर्तमेढ १९५४ मध्ये त्यांनी अत्यल्प भांडवलावर रोवली. उद्योगाचा विस्तार झाला आणि १९८१ मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. असे त्याचे नामकरण झाले. छाब्रिया यांनी भारतात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल्स आणि ठिबक सिंचनासाठीच्या केबल्स ही नावीन्यपूर्ण उत्पादने आणली. भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली. […]
आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions