बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण
अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]
अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]
राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या ‘पीसीओ ‘ क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले. आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ‘ पब्लिक टेलिफोन बूथ ‘ च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. […]
न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो. […]
ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]
हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता. […]
जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. […]
पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे. […]
अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप,होम,पितृतर्पण,दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते,असा शास्त्रसंकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात. हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुर्ताचा दिवस. […]
रात दिसाशी जोडली सांज कौतुके विसावली गार झुळुकेत अंब्याच्या उन्ह घराकडं परतली मावळती रंगांनी माखली सोन्याचा गोळा पंखाखाली दडवे जशी माय द्वाड बाळास कुणी सांगू नका कागाळी पाखरं शुभ्र आणिक काळी परती सोबत कातरवेळी दाणा पाणी झाले आज उद्याचे पाहू उद्या सकाळी केशर काजळ छाया काळी दाटून येते अशी संध्याकाळी राती उमलत रातराणी चांदणं रातीच्या केसांत […]
डोळ्यांत अश्रू जमला तरी तो धुळीने तरळला, अस हसत सांगते ती स्त्री च असते.. वेदना विसरुन साऱ्या संसारात साखरेसारखी अलगद अशी विरघळते ती स्त्री च असते.. स्वतःकडे नंतर पण नवरा मुलांचं सार आधी आवर्जून बघते ती स्त्री च असते.. स्वतःच्या भावना मन वेळप्रसंगी न पाहता, संसारात इतरांना जपते ती स्त्री च असते.. आवडी निवडी माहेर सवयी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions