नवीन लेखन...

नाते

विसरून आठवांच्या पाऊली तू असा येतोस कां? तुझे नी माझे नाते आतातरी सांगशील कां?।। दिवस हे चालले असे ऋतु हे प्रसवती जसे श्वास हे जगता जगता आंसवे ही झरतात कां?. जल जीवनी वाहिले असे मनभाव सारे विरले जसे निर्माल्य सहज होता होता भावतरंग मनी जागतात? दैवयोगे, मनप्रीत उमलता मूकमनभाव गुंतता गुंतता प्रीतसुगंध दरवळता दरवळता भावकळ्या तू […]

दादरमधील शिवाजी मंदिराचा शुभारंभ

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. […]

कागदोपत्री माणूस (कथा)

तसं पाहिली तर त्या कागदपत्रांत काय अर्थ होता? आजच्या हिशेबात तो माणूस, त्याच्या निष्ठा, त्याची कार्यपद्धती जशी काळाच्या ओघातनिष्प्रभ झालेली होती. तसंच त्या कागदपत्रांच. त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती. […]

एक अनुत्तरित प्रश्न

जीवसृष्टित मानवी जन्म श्रेष्ठ मानला आहे. कारण तो संयमाने, सतर्कतेने, विवेकाने विचार करु शकतो. चांगले काय? वाईट काय? याच्या निष्कर्षा पर्यंत येवू शकतो. जो माणूस आहे तो स्वतः नेहमीच जे अगम्य आहे! जे अतर्क्य आहे! त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि वसुधैव कुटुंबक ही मानवतेची पवित्र भावनां मनांत सातत्याने जागृत ठेवतो. […]

परदेश

रुक्या टक्यात मोजावा तो काळ आता सरला डोलरात बाळ सांगे किती रुबाबे मजला आमी येडे नि बावळे करे त्याचा फुगीर आकडा रुपयात किती भेटे याचा हिशेब हा एवढा… तरी वाटे बरे आहे माझा लेक परदेशात सांगतो मी अभिमाने नाणं खणखणीत माझं पण खरं सांगू वाटे इथे हवे रे कुणी बाळा पैसा कामी येतं नाही पुरे क्षण […]

एका लयीत बद्ध

एका लयीत बद्ध प्रणय धुंद गारवा, चांदण टिपूर नभी छेडतो हलकेच मारवा.. स्पर्श तुझा मोहक लाडिक तुझी अदा, ये प्रिये जवळ तू छेडतो मज चांदवा.. मलमली मिठी तुझी नयन कटाक्ष मदनबाण हा, घायाळ करी तू अशी जीव वेडा होई असा.. लाजते तू अशी मधुर चंद्र ही पाहतो तुला, रोमांच उठे हलकेच मिठीत तू घट्ट येता.. गात्र […]

आत्मानंद

जीवनात अचानक कधी असा क्षण येतो । सारे स्तब्ध नीरव शांत होते । ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो । साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात । उरतात फक्त निर्विकार स्पंदने । हा जन्म अन मृत्यु मधील अंतीम थांबा असतो । हाच शून्यावस्थेतील अचेतन अखेरचा जीवन सूर्यास्त । जो शाश्वत मृत्यु, अंत! जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य । जन्मताच मृत्युचही वरदान […]

२ मे १८७२ – भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे उद्‌घाटन

२ मे १८७२ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन करण्यात आले. डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय १८७५ साली जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्याआधी मुंबईत एखादे वस्तुसंग्रहालय असावे अशी कल्पना १८५० साली जन्मास आली. आणि त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन ‘व्हिक्टोरिया अॅ्ण्ड अल्बर्ट’ म्युझियम उभे राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर १९७५ साली […]

कथे, सरिते, प्रिये… (कथा)

कथे, सरिते, प्रिये! तू एक आदिम सरिता आहेस. हजार वर्षांपासून तुझ्या काठानेच फुलत राहिले माणसाचे आयुष्य आणि भावविश्व. तुला प्राशून, मनामनावर तुझे सिंचन करून समृद्ध होत गेला माणूस! बहरत गेली त्याची संस्कृती हजारो वर्षे केवळ तुझ्यामुळे! […]

1 204 205 206 207 208 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..