टकमक (कथा)
भूक लागलीय पण वडापाव नको, पैसे हवेत. कशासाठी ? मी पैसे देणार नाही हे तिनं ओळखलं असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजायला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल. […]
भूक लागलीय पण वडापाव नको, पैसे हवेत. कशासाठी ? मी पैसे देणार नाही हे तिनं ओळखलं असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजायला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल. […]
अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय. अर्जुन उवाच । ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ अर्जुन म्हणाला‚ “कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ? तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी‚ जनार्दना ? १ […]
निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे. […]
राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. […]
कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात. आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही. ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे छप्पन्न डॉलर्स परत मिळतात. आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील. एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे. […]
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. ‘लेबर किसान पार्टी हिंदुस्थान’ या संघटनेने हा दिवस पाळला होता. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. […]
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ हे नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’ असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली. […]
ऐका गं भिंतींनो ऐका माज गाऱ्हाणं ऐकून बी समजून घील असं न्हाई कोण इथं शानं परत्येक जण गढलाय जगाच्या कुटाळक्यांत कुटं कोण लढत्यात तर कुटं कोण जागा लढवित्यात खोपीतला छुपा वडवानल कुणालाच दिसतं न्हाई समदं पाह्यजे आलबेल कुणालाबी परवा न्हाई भिंती तेवड्या निब्बर नायत दारं, झडपांनी मोकळं हुत्यात ल्हाही ल्हाही जळत ऱ्हातं काळजा अल्लद फुंकर घालत्यात […]
अशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका. […]
जीव गुंतला रे जीव गुंतला चांदण्यात या चंद्र ही बहरला, गुंतून गेल्या रे अधर जाणिवा तारका लाजल्या आकाशी पुन्हा.. जीव गुंतला रे जीव गुंतला धुंद झाल्या रे मलमली भावना, आस लागली शांत सरितेला ओढ लागली सागर भेटीला.. जीव गुंतला रे जीव गुंतला आठवणीत तुझ्या मोगरा फुलला, अलवार मिठीत तुझ्या स्पर्श बावरा प्रहर थांबेल तू मला ओढून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions