खेळ उन सावल्यांचा
जन्म दान त्या विधात्याचे दृष्टांत सुखदु:ख वेदनांचा खेळ जणु उन सावल्यांचा साराच भोग तो प्राक्तनाचा।। ऋतुऋतुंचे, खेळ मनोहर नभी सडा चंदेरी नक्षत्रांचा नित्य लपंडाव उषानिशाचा खेळ, जणु उनसावल्यांचा।। जन्मासंगे मृत्युचीच सावली हा साक्षात्कार जीवसृष्टिचा कधी शांतता, कधी तप्तता खेळ, जणु उनसावल्यांचा।। जगणे असते आपुल्या हाती धरूनी हात विवेकी बुद्धिचा प्रत्येकाच्याच जीवनी असतो हा खेळ नित्य उनसावल्याचा।। […]