जगण्याचे मर्म
हरवुनी जाता क्षण श्वासासंगे आयुष्य, विलया जात आहे जीवसृष्टीची जरी ही सत्यता मुक्ती जीवाची मन:शांती आहे।। क्षणोक्षणी, शिकत जगावे गतं न शोकं! सिद्धांत आहे जे जे चांगले,ते नित्य स्मरावे दुःख, वेदनां प्रारब्धभोग आहे।। जीवनी, पेलुनिया आव्हानांना संघर्ष करणे हाच पुरुषार्थ आहे जन्म मानवी, कृपा दयाघनाची तोच एक सद्बुद्धी देणारा आहे।। विवेकी, सत्संगात सदा रहावे मीत्व सोडुनी […]