आत्मसुख
सखे सुखवित सुखा शांत निजली यामिनी नको जागवुस आता पुनःपुन्हा स्पंदनांना गंगौघी अमृतात विरघळली अधरे तृप्तवुनी अंतरीच्या साऱ्याच संवेदनांना निष्पाप, निरागस अवीट आत्मसुखदा अव्यक्त शब्दभावनांना व्यक्त कसे करु सांगना झाला श्रावण पावन, मंत्रमुग्धली पावरी राधामीरा आळविती गीतात भक्तीभावनांना –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २९४ १६/११/२०२२