2022
व्यक्तिमत्व घडविणार्या सुट्ट्या आवश्यकच आहेत
सुट्टी म्हणजे स्वातंत्र्य आहे स्वैराचार नव्हे हे मुलांना पटवून द्यायला हवं, त्याप्रमाणेच त्यांना गुंतवायला हवं. रिकामं घर सैतानाचं घर असतं हे ही लक्षात घ्यायला हवें.सुट्टीत मुले खेळतात, संवाद करतात, निरीक्षण करतात, पाहुणे आल्यावर शिष्टाचार शिकतात, आजची पिढी अलिप्त कोरडी होत आहे त्यांना लोकांमध्ये मिसळणं, भावभावनांची जाण येणंआवश्यक आहे. […]
बदलाच्या सात पातळ्या
वेगळे परिणाम मिळण्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने विभाजीत केल्या गेल्या पाहिजेत. बदलाचे हे मॉडल सात पातळ्यांमध्ये विभाजीत केलेलं आहे – सोप्यापासून कठीणाकडे […]
कधी कधी थकत जातं मन
कधी कधी थकत जातं मन विचारांच्या अगणित काहूरात तरीही उरतात अनेक प्रश्न सारे अर्धवट अनाकलनीय गूढ आवर्तनात मनाला क्षीण होतो हलकासा आणि विखुरतात आवेगांचे वारु पडझड होते अनंत कथांची उरतात मागे वेदनांचे तेच वारु खोल तळाचा गाभा अंधारुन जातो उध्वस्त मनात काट्याचा घाव बोचतो तरीही राहतात अनेक प्रश्न अनुत्तरित काही उत्तरांची काजळ रेघ निसटते त्या घनगंभीर […]
वात्सल्य
मी मुलांनो, वाट तुमची पहाते वात्सल्य, ओघळूनी गहिवरते जीव माझा, लेकरांत गुंतलेला प्रतिक्षेत सारेच मी भुलूनी जाते तुम्हावीण, मीच इथे एकटी जडावलेले तनमन कातर होते तुम्ही सारे पाहुण्यासारखे येता काळजातुनी, मातृत्व पाझरते अधीर व्याकुळ शीणली काया तरीही, तुमच्यासाठी मी जगते सुरकुतलेल्या या हातांनीही जे जे तुम्हा आवडते ते ते करते तुमचे येणे, माझे भाग्य सुखाचे वृद्धत्वात […]
तो रविवार (कथा)
तो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,. […]
माझे जीवन गाणे
आपल्या अतिशय अतिशय व्यस्त कामातूनही वेळ काढून मोठ्याने बरं का कानांत कोंबून नाही आपल्या आवडीची गाणी नक्की ऐका… ऐकवा ! अशीच ऐकून ऐकून नंतर ती अचानक आठवतात… आणि आपल्याला त्यांच्या आठवणीत रमवतात! […]
इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी
मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती. […]
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. सर्वप्रथम १९८५-९०, नंतर १९९०-९५ आणि नंतर १९९९-२००४ अशी त्यांची आमदारकीची कारकीर्द राहिली. धारावी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केल. दरम्यान १९९३ ते ९५ या काळात ते राज्यमंत्री राहिले. यानंतर १९९९ ते २००४ त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. […]
इराकचे एकेकाळचे हुकुमशहा सद्दाम हुसेन
सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. […]