नवीन लेखन...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अपर्णा रामतीर्थकर

हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या. […]

निवेदिका स्मिता गवाणकर

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगली आकाशवाणी येथे आवाजाची चाचणी दिली आणि निवेदिका हा त्यांचा प्रवास सुरु झाला. सुरवातीला त्यांना फक्त आकाशवाणीची उद्घोषणा, रूपरेषा इतकंच काम असायचं. पण नंतर स्मिता गवाणकर यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली व त्यामुळे निवेदन या कलेची छान ओळख झाली. त्याच दरम्यान स्मिता गवाणकर यांनी मुंबई दूरदर्शन मध्ये रीतसर परीक्षा देऊन नोकरीला सुरुवात केली. […]

मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो. […]

जाहिरात क्षेत्रातला एक ‘कल्पक संकल्पनकार’ गोपीनाथ कुकडे

ॲ‍गव्हेन्यूजमध्ये असताना कुकडे यांनी अनेक ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती केल्या, त्यांपैकी ओनिडा टीव्ही, पानपसंद ही पानाचा स्वाद असलेली गोळी, स्कायपॅक कुरियर्स, यूएफओ जीन्स, व्हीआयपी फ्रेंचीसारखी अंडरवेअर्स ही कामे विशेष गाजली. […]

गन्स ऑफ नॅव्हरॉन्सचे कादंबरीकार ॲ‍कलिस्टर मॅक्लीन

मॅक्लीन यांच्या २८ कादंबऱ्या आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबऱ्यावर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. […]

लॅम्बोर्गिनीचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी

१९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता. […]

सख्या

एक रस्ता हवा सख्या तुझ्या हाती हात गुंफून अव्याहतपणे तुला शोषत राहण्यासाठी तहानलेला भ्रमर जणू मी, तू एक मस्तवाल मोठ्ठालं फुल दिमाखदार नि साजर, थोडस बुजरं एक अथांग क्षितिज हवं सख्या अधीर अनुरक्त होऊन कवेत सामावण्यासाठी तू एक खगेंद्र, उंचच उंच झेप घेऊन एकटाच मत्त दूरवर काही शोधणारा एक थिजलेला काळ हवा सख्या मनाच्या द्वंदातील अनंत […]

दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते अरुण काकतकर

जन्म. २४ एप्रिल १९४७ अरुण काकतकर हे एक चालते बोलते सांस्कृतिक केंद्र आहे. ते दूरदर्शन वर नोकरीत असताना त्यांचे मुंबईतले घर म्हणजे अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. अरुण काकतकर हे नांव आता पन्नाशीच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या डोळ्यांपुढचं नांव. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर […]

द लास्ट सीन

The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने… […]

अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले

अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले व्याकुळ आठवणीत काहूर उठले येते तुझी आठवण रोज क्षणोक्षणी डोळे ओले होतात तुझ्या साठवणीत अशी कशी तुझ्यात मी हलकेच गुंतले तुझ्या मिठीचे चांदणे अलगद मज लुटले असे कसे मन तुझ्यासाठी आतुर होते तुला नाही कळले ते भाव ओले हळवे असा कसा तू मोह सांडून दूर गेला अलवार तुझ्या मिठीचा स्पर्श […]

1 209 210 211 212 213 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..