मुडदा (कथा)
आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते. […]