माकडाचा पंजा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १४)
जेकबज् हा त्याच्या काळांत विनोदी प्रहसन म्हणजे फार्स लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. तो अधूनमधून भय कथा लिहित असे. आजही तो “मंकीज पॉ” ह्या भयकथेसाठीच प्रसिध्द आहे. माणूस एखादी इच्छा करतो पण ती पूर्ण झाली तर परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. ही कथा सुपरनॕचरल प्रकारांत मोडते. त्याने बऱ्याच कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. त्यापैकी कांहीवर चित्रपटही आले. मंकीज पॉ ह्या कथेवर चित्रपट, नाटक, टीव्ही, इ. सर्व माध्यमांतून अनेक आविष्कार आले. मूळ इंग्रजी कथा ३८००हून अधिक शब्दांत लिहिलेली आहे. मी तिचं मराठी रूपांतर साधारण २३०० शब्दांत केलं आहे. […]