नवीन लेखन...

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले. […]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक

जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते. […]

पत्रकार निखील वागळे

२००७ साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले. २००७ ते २०१४ पर्यंत निखिल वागळे यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला. […]

भारूडरत्न निरंजन भाकरे

मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. […]

कवयित्री आणि लेखिका सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो

त्यांचं बालसाहित्य, लोकसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. २०१६ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या नावाचे आणि नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. […]

लव्हाळ्यापरी जगावे

जरी लाभली उंची महानता पाय जमिनीवरतीच असावे पुरात महावृक्ष कोलमडती लव्हाळ्यापरी, नम्र जगावे हाच सत्य, दृष्टांत निसर्गाचा मीत्व, आत्मप्रौढत्व टाळावे व्यक्त व्हावे जगती सुसंवादे सदा सर्वदा सर्वास उमजावे जो तो जगतो स्वांतसुखाय त्यास थोड़े, उल्हसित करावे जगती श्रेष्ठ आधार शब्दांचा निरपेक्षी, सकला देत रहावे कुणाचाही उपहास करु नये मनामना, नित्य जपत रहावे क्षणभंगुर असते हेच जीवन […]

‘सिंफनी झपाटा’ या ऑर्केस्ट्राचे शिल्पकार वसंत खेर

वसंत खेर यांनी पाटर्नर, डॉ. तुम्हीसुद्धा, आमच्या या घरात आदी नाटकांच्या जाहिरातीही तयार केल्या. ‘मंगलगाणी, दंगलगाणी’, व ‘भले तरी देवू’ हा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम याची त्यांनी निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ आवाजातील भाषणे कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविली. […]

यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला

३ एप्रिल २००५ रोजी यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला होता, याला आज १७ वर्षे झाली. ज्यामध्ये जावेद करीम हे एका प्राणिसंग्रहालयाची माहिती देत होते. या व्हिडियो चे नाव आहे “ME AT THE ZOO”
आजच्या युगात युट्यूब कोणाला माहित नाही असं होणार नाही. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती युट्युबवर व्हिडियो बघण्याला देते हे एका सर्वेमधून सिद्ध देखील झाले आहे. मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून या काळात युट्युब समोर येत आहे. […]

अभिनेता मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअर ची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. […]

क्लॅपरबाॅय

१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी […]

1 216 217 218 219 220 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..