23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, कॉपीराइट दिन आणि नाटककार शेक्सपिअर यांचा जन्म आणि स्मृतीदिन
वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणाऱ्यांना नक्कीच आणता येईल. […]