नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम

एक शून्य शून्य या मालिकेने त्यांना ओळख दिली. मराठी नाटक, मालिका, काही चित्रपट असा प्रवास सुरु असताना १९९८ मध्ये सीआयडी या मालिकेसाठी बोलावणे आले. ‘एक शून्य शून्य’ पासून ते बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत त्यांची टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. त्या सगळ्या सिरियल्स मध्ये शिवाजी साटम यांनी काम केले आहे. अगदी ‘आहट’पासून ते ‘सीआयडी’पर्यंत. […]

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा.अशोक केळकर

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ ॲ‍न्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली आहे. ते भाषाविज्ञानामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. करणार्याक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर यांना त्यांच्या कामगिरीबद्दल साहित्य अकादमी, पद्मश्री आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. […]

जगद्विख्यात व्हायोलिनवादक येहुदी मेनुहीन

येहुदी मेनुहीन यांनी अल्लारखा, रविशंकर यांच्यासह अनेक ऐतिहासिक मैफीली केल्या होत्या. १९६८ साली इस्ट मिट वेस्ट या अल्बम साठी रविशंकर यांच्यासह येहुदी मेनुहीन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. […]

शिक्षणतज्ज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ वि वि. बोकील

१९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’.मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट झळकला. […]

आद्य कापड-कारखानदार विष्णु रामचंद्र वेलणकर म्हणजेच धनी वेलणकर

वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले. […]

तुमचे कौटुंबिक, सामाजिक संबंध कसे सुधाराल

आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच […]

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय)

एलिझाबेथ वयाच्या २६ व्या वर्षी सम्राज्ञी बनल्या. राजकन्या एलिझाबेथ यांचा राज्याभिषेकाचे त्यावेळी थेट दूरचित्रवाणीवरून प्रसारण करण्यात आले होते. राजघराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या सोहळ्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रसारण करण्यात आले होते. राणी आणि प्रजा यांच्यातील संबंध यापुढे कसे असणार आहेत हेच या प्रक्षेपणाने दाखवून दिले. एलिझाबेथ (द्वितीय) यांचे व्यक्तीमत्त्व असामान्यच आहे. वयाच्या १८ व्या वर्षी या राजकन्येने राजाशी भांडून हट्टाने महिलांच्या सहायक प्रादेशिक सेवेत सहभागी झाल्या. तेथे त्यांनी लष्कराचे ट्रक चालवण्याचे काम केले. त्यासाठी ट्रकचे दुरुस्तीकाम शिकल्या. हे असे यापूर्वी कोणा राजघराण्यातील व्यक्तीने केले नव्हते. म्हणूच प्रत्येकाला त्या आपल्यातलीच एक वाटे. […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य, असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली […]

युवा लेखक चेतन भगत

२०१६ मध्ये फोर्ब्स इंडिया मैगजीन ने टॉप-100 सेलिब्रिटीजच्या यादीत चेतन भगत यांचे नाव सामील केले होते. लेखना व्यतिरिक्त चेतन भगत यांनी ‘किक’, ‘हैलो’, ‘काई पो छे’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी पटकथा लिहिल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांना ‘काई पो छे’ चित्रपटासाठी फिल्मफेयर बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड मिळाला होता. […]

मराठी चित्रकार जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर

ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६०चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत. […]

1 218 219 220 221 222 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..