नवीन लेखन...

काळाची लेखणी

“बॅरिस्टर ” केलं विक्रम गोखलेने! त्यानंतर सचिन खेडेकरने प्रयत्न केला. पण विक्रम तो विक्रमच! लागूंच्या नंतर खूपजणांनी ” नटसम्राट “चे शिवधनुष्य शब्दशः उचललं , पण नांव कोरलं गेलं ते फक्त श्रीराम लागू! […]

अभिनेता सुव्रत जोशी

‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं त्याच्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके. […]

ज्येष्ठ गणितज्ञ शकुंतलादेवी

‘मानवी संगणक’ असे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या गणितज्ञ शकुंतलादेवी या अतिशय कठीण गणितीय आकडेमोडी क्षणार्धात करीत असत. ‘बालपणीच सर्वज्ञता वरी तयांते’ या वर्णनाची आठवण व्हावी अशी गणिती प्रतिभा आकडय़ांशी लीलया खेळणाऱ्या शकुंतलादेवींकडे होती. ‘मानवी संगणक’ असे त्यांना म्हटले जाई, एवढे त्यांचे आकडेमोडीवर प्रभुत्व होते. मोठमोठय़ा संख्यांचे गुणाकार, भागाकार आदी गणिती क्रिया त्या चटकन् करत. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे शालेय शिक्षणही झालेले नव्हते. […]

फॅशन फोटोग्राफर व बॉलीवुड निर्माते अतुल कसबेकर

२००७ मध्ये त्यांनी आपली सेलिब्रिटी मैनेजमेंट कंपनी ‘Bling’ ची सुरुवात केली. दीपिका पादुकोण पासून फरहान अख्तर पर्यत अनेक सेलिब्रिटी त्याचे क्लाइंट आहेत. २००३ ते २०१२ पर्यत अतुल कसबेकर यांनी किंगफिशर कैलेंडरसाठी फोटो शूट केले. […]

संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार

गुलाम दस्तगीर बिराजदार हे प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे वडील होत. पंडित गुलाम यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. शहाजी हायस्कूल, सोलापूर व मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार मिळाला होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठ्य पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते.बिराजदार यांना १८ हून अधिक पुरस्कार मिळालेले होते. […]

अभिनेते सुमीत राघवन

अभिनेत्यासोबतच ‘महाभारत’, ‘तू तू मैं मैं’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवन यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. मराठी नाटकं, सिनेमांसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुमीत राघवन यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. […]

भारताचे विख्यात ऑफस्पिनर श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन

रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (६३७) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी ५३० विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (१५६०) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी १३९० विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते. […]

जागतिक वसुंधरा दिवस

आपल्या पिलांना मोकळा श्वानस घेत बागडण्यासाठी ‘स्पेस’ आणि उडण्यास ‘आकाश’ देण्यासाठी सुजाण प्रयत्न केवळ आपल्याच हातात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्राउंड टु स्मार्ट अर्थ’ असा करीत सुंदर, सुव्यवस्थापित आणि सुसज्ज वसुंधरेचे ‘खरेखुरे स्वप्न’ पाहण्याची संधी भावी पिढीला केवळ आपणच उपलब्ध करून देऊ शकतो. मला काय करायचे, यापेक्षा ‘मी काय करू शकतो’ ही आपली भूमिकाच खरंतर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी ‘सेल्फ आयडेंटिटी’ (स्वतःची ओळख) निर्माण करते. […]

प्राण आणि श्वास

सर्व साधनांचा विचार करता योगाभ्यासामध्ये जीवनात आनंद उपभोग घेण्यात लयबद्ध श्वासोच्छ्वासाला सर्वात जास्त महत्त्व आहे. परंतु श्वासातील विघाडाने सूक्ष्म/स्थूल पातळीवर जीवनमान कमी होण्याची जाणीव होते. […]

ज्येष्ठ तबलावादक विजय किरपेकर

साथ संगत व स्वतंत्र तबला वादन साठी त्यांनी १९८६ मध्ये दुबई व शारजा चा दौरा केला होता. आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या तबला परीक्षांचे पेपर तपासणे, व परीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले. किरपेकर यांनी २००१ मध्ये लिहिलेल्या ‘ताल-निनाद’ ह्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद लाभला. […]

1 219 220 221 222 223 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..