नवीन लेखन...

जाऊ तेथे वारी

सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे…  […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १

माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला. […]

ठाणे शहराचे स्वातंत्र्यपूर्व साहित्यिक योगदान 

जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता. […]

बिबट्या खेळवणाऱ्याची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १३)

जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा. […]

यशस्वी लोक हे नेहमीच यशस्वी का असतात

मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो. […]

गांवाची ओढ (कथा)

माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं. […]

युध्दपट ‘हकीकत’ चित्रपटाला ५८ वर्षे पूर्ण झाली

हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. […]

माई री, मैं कासे कहूँ पीर, अपने जिया की !

१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ ! […]

जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला. […]

‘गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला. […]

1 221 222 223 224 225 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..