नवीन लेखन...

ललित लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष! […]

दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते जयंत देसाई

1930 मध्ये आलेला चित्रपट नूर-ए-वतन हा त्यांचे पहिले स्वतंत्र दिग्दर्शन असलेला चित्रपट होत. रणजीत फिल्म कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी दोन बदमाश (१९३२), चार चक्रम (१९३२) आणि भूतियो महल (१९३२) या काही चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्य केले. पुढे त्यांनी तुफानी टोली (१९३७), तानसेन (१९४३), हर हर महादेव (१९५०) आणि अंबर (१९५२) यासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तानसेन चित्रपट हा १९४३ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. […]

पंढरिये माझे माहेर साजणी

पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते. […]

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे. […]

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली. […]

मराठी वाड्मयातील आत्मचरित्रे

समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.

गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. […]

श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते

कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची. […]

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर

१९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं. […]

प्रदूषणाभिमुख कार्यसंस्कृती!

कार्यसंस्कृतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अर्थात त्यांवर सहजासहजी एकमत होत नाही. प्रदूषित कार्यसंस्कृतीची व्याख्या संस्थेनुसार बदलत जाते आणि ती व्याख्या मतमतांतरे निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. मात्र धोक्याचे इशारे एकसारखे असतात. […]

1 224 225 226 227 228 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..