नवीन लेखन...

ते मानवच महामानव असतात

जात धर्म आणि देशाच्या सीमा ज्यांना नसतात ते मानवच महामानव असतात… आपल्या देशात जन्मले होते असेच एक महामानव १४ एप्रिलला… ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर… प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास, प्रचंड परिश्रम आणि जीवनातील प्रचंड संघर्ष यांचे मुहूर्त रूप… बाबासाहेबांचा जीवनपट अभ्यासला की भारावून जायला होते… आणि वाटत राहते… या भूमीत असेच महामानव पुन्हा पुन्हा जन्माला येत राहायला […]

क्युटशी गोष्ट – भाग २

रविवार सकाळ असूनही काळ्यांच्या स्वयंपाक घरात बरीच गडबड चालू होती. डायनींग टेबलावर डिझायनर प्लेट्स, मोतीचुर लाडूंचा बॉक्स, मलई बर्फी आणि कट्यावर पोह्याची तयारी. एकीकडे गॅसवर दूधही गरम होत होत. […]

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले

नागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते. […]

जागतिक हॅम रेडिओ दिवस

भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. […]

ऑलिम्पिक तुमच्या यशाचे तुमचं गाईड

आपल्या पैकी प्रत्येकजण स्वप्न पाहतो पण ती स्वप्नं साकार करण्यासाठी गरज असते ती निर्धार, शिस्त आणि प्रयत्नांची. ऑलिम्पिक म्हटलं की आपल्या मनात विचार येतात ते जबरदस्त मनोरंजनाचे. पण जरा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की ऑलिम्पिक खेळांमधून आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकता येतील.. […]

पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे

काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला १८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. १८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले. […]

सामना मराठी चित्रपट प्रदर्शित झाला

एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. “सामना” चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. […]

इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर

थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
[…]

सवाई माधवराव पेशवे

सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले. […]

‘लोकसत्ता’ सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम

मुकुंद संगोराम हे गेली चार दशके पत्रकारितेत सक्रीय आहेत. सध्या मुकुंद संगोराम हे लोकसत्ता दैनिकाचे सहाय्यक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. मुकुंद संगोराम हे समाजकारण, नागरी प्रश्न, संगीत, कला, संस्कृती या विषयावर सातत्याने लेखन करत असतात.त्यांची ‘आजकाल’, ‘समेपासून समेपर्यंत‘, ‘ख्यालिया’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून सध्या ते‘स्वरावकाश’ या सदराचे लेखन ते करत आहेत. […]

1 225 226 227 228 229 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..