निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण
१९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले. […]
१९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले. […]
गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही. असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं. कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं. गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता. त्यासाठी लागणारे भांडवल नव्हतं. आम्ही मित्र त्याच्यापेक्षा जरा बऱ्या परिस्थितीत […]
भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. […]
शब्दा सहज वेचुनी फक्त लिहावे झटपट, हवेतसे मुक्त गुंफीत जावे काव्य म्हणुनी शब्दां उधळीत जावे सत्यार्थ! जीवनाचे कुणी सांगावे. काव्याभ्यास! वाचन,चिंतन, मनन साधना आत्मचिंतनी सद्भाव असतो शुकासारखे वैराग्य,वशिष्ठापरी ज्ञान तिथे वाल्मीकी जैसा कवी जन्मतो ज्ञाना, तुका, नामा, नाथा, कबीरा समर्थ रामदासा,सांगा कोण वाचतो धर्म ग्रंथांचा सांगा अर्थ कोण जाणतो मूलमंत्र! मानवतेचा कोण जाणतो मन प्रांगण! शब्दाक्षरी […]
कुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतीचित्रे’ या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर ‘सखाराम बाइंडर’साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या ‘सखाराम बाईंडर’मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. […]
‘भारताचे सांस्कृतिक राजदूत’ म्हणून जगभरातील अनेक देशांनी पाचारण केलेले पं. रविशंकर हे जगभरातील सर्वाधिक पुरस्कार व सन्मान मिळवलेले भारतीय कलाकार असावेत! ‘डॉक्टर ऑॅफ फाइन आटर्स’ (कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून, १९६८), तीन वेळा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड (१९६७, १९७० व १९७३ : हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय), ‘युनिसेफ’ सन्मान (१९८०), मेरीलॅण्ड व बाल्टीमोर राज्यांचे सन्माननीय नागरिकत्व (१९८४), फ्रान्स सरकारचा कलाविषयक सर्वोच्च नागरी सन्मान (१९८५), ‘फुकोओका एशियन कल्चरल प्राइझ’ (जपान १९९१), ‘रामोन मॅग्सॅसे’ पुरस्कार (फिलिपाइन्स, १९९२), ‘महात्मा गांधी’ सन्मान (लंडन, १९९२), हार्वर्ड व न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९३), ब्रिटीश कोलंबियातील व्हिक्टोरिआ विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९४), ‘प्रीमियम इंपीरिअल’ सन्मान (जपान आर्ट असोसिएशन, १९९७), ‘पोलर म्युझिक’ अवॉर्ड (नोबेल सन्मानाची प्रतिष्ठा असणारे, १९९८), ब्रिटीश सरकारकडून ‘नाइटहूड’ हा नागरी सन्मान (२००१) असे जगभरातील अनेक सन्मान त्यांना दिले गेले. अमेरिकेतील ह्यूस्टन नगरपालिकेने १९८३ साली ४ व ५ जून हे दोन दिवस ‘रविशंकर दिन’ म्हणून साजरे केले!
[…]
माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. […]
हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाड्याने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले, आणि पदार्पणातच ‘मला आई व्हायचंय’ या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाले. […]
‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कवितांवर अठराव्या शतकातील इंग्रज कवींचा प्रभाव दिसून येतो. ‘हिरोइक कप्लेट’ आणि ‘स्पेन्सरिअन स्टँझा’ हे अठराव्या शतकातील लोकप्रिय वृत्तप्रकार होते. वरील दोन्ही कविता ‘हिरोइक कप्लेट’ मध्ये रचिलेल्या आहेत, तर ‘गिल्ट अँड सॉरो ऑर इन्सिडंट्स अपॉन सॉल्झबरी प्लेन’ ह्या आपल्या कवितेसाठी त्यांनी ‘स्पेन्सरिअन स्टँझा’चा वापर केला आहे. शीर्षके, शब्दकळा, वर्णने अशा संदर्भातही वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कविता अठराव्या शतकातील इंग्रजी काव्याच्या संकेतांना अनुसरताना दिसतात; पण अशा कवितांतही आत्मनिष्ठेचा एक समर्थ सूर दिसून येतो. […]
मक, बेहलाव आणि मींड या गायनाच्या अंगांवर डॉ.राम देशपांडे यांची हुकूमत आहे. त्यांच्या लयकारी आणि ताना यांबद्दल ते रसिकांत लोकप्रिय आहेत. प्रचलित आणि अनवट रागांचा डॉ.राम देशपांडे यांचा खास अभ्यास आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions