ज्येष्ठ उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग
दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रोप-वे बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी रोप-वे हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे. रोप-वे बरोबरच तिथे आता निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. […]