ज्येष्ठ हार्मोनिअम वादक, गायक विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख
उत्तम दर्जाचे हार्मोनिअम संगतकार म्हणूनही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगल व भीमसेन जोशी अशा किराणा घराण्याच्या गायकांना विठ्ठलरावांनी समरसून साथ केलीच, शिवाय कुमार गंधर्व, सिद्धेश्वरी देवी, अझमत हुसेन खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर अशा ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या कलाकारांनाही ते तेवढीच रोचक संगत करत असत. […]