नवीन लेखन...

ध्यास

अंतरी स्नेहलभाव असावा मनी नसावी असुया कटुता निर्मल मैत्रसहवास घडावा भक्ती प्रीतीचा छंद जडावा…. संस्कारी अमृतात भिजावे हॄदयी सत्यप्रकाश पडावा संतत्वाच्या जळात डूंबता जीवनाचा सत्यार्थ कळावा…. जन्म मानवी संचित युगांचे सत्कर्मी सदा जगत रहावा चैतन्याचा आत्माच हरिहर ध्यास जीवा त्याचा असावा…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२८९ ७ /११ /२०२२

सरती, सहज, स्वाभाविक मावळती

मोठ्यामोठ्याने आरती,सोबत शंखनाद तरीही एक सदगृहस्थ विचलित न होता शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. भोवतीच्या गल्बल्यापासून अलिप्त ! अपरिहार्य मावळतीचा मोठा धडा त्यांच्याकडून मला मिळाला. […]

माणसं जोडणारा गणेशोत्सव

बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या. बर्वे बाईंनी आणि मुलांनी श्री गणेशाची मुर्ती पसंत केली का असे विचारले असता […]

कल्पनाची ‘आयडिया!’

कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या […]

रॅपिड ट्रान्झिट रेल सिस्टीम…

जगामध्ये जसजशी शहरं झपाट्याने वाढत गेली, तसतशी जलद वाहतुकीची गरज वाढू लागली, लोकल-रेल्वेयंत्रणा अपुरी पडू लागली. त्यातच जागेची कमतरताही भासू लागल्याने तीन नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्या: १. मेट्रो २. मोनोरेल ३. लाईट रेल युरोपमध्ये जमिनीखालून रेल्वे (अंडरग्राऊंड ट्यूब-रेल्वे) फार लवकर उपयोगात आणली गेली होती. लंडन मधील पॅडिंग्टन ते फटिंग्टन अशी ४ मैल लांबीची ट्यूब-रेल इ.स. १८६३ […]

आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी

भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे […]

विठु वाळवंटी

आली माऊली विट्ठलाचे भेटी नाचे परब्रह्म आनंदे वाळवंटी..।।धृ।। आषाढ़ी कार्तिकी चाले दिंडी धावते मोदे संतांची पालखी हरिदास टाळमृदंगे नाचनाचती…।।१।। तुळसीमाळ गळा गंध कपाळी मुखे हरीनाम गरजे आसमंती नेत्री राणा पंढरिचा लागे भेटी…।।२।। सोहळा सुखाचा चंद्रभागेतीरी जीवाजीवासंगे गुंतला विठ्ठल अंतरी उरला केवळ जगजेठी…।।३।। गाभारी, साक्ष द्वैत अद्वैताची निष्पाप, गळाभेट वैष्णवांची रूपडे सावळे नाचते वाळवंटी…।।४।। — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

कला

कला या “जनरिक” शब्दात व्यक्तीच्या हातून जन्माला येणाऱ्या – चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण अशा मानवी स्पर्शनिर्मित गृहीत असतात तर चित्रपट, नाटक, बॅले या “स्पेशलाइज्ड” आणि सामूहिक कला मानल्या जातात आणि त्यांत मानवेतर घटकांचे (वाद्य, रंगभूषा, प्रकाशयोजना इ) मोठे योगदान असावे लागते. […]

हिमयुगातलं तापमान

गेलं हिमयुग हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि बारा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं. या हिमयुगाची कमाल शीतावस्था वीस-एकवीस हजार वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं, विविध पुराव्यांद्वारे दिसून आलं आहे. या कमाल शीतावस्थेच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सरासरी तापमान हे, आजच्या सुमारे पंधरा अंश सेल्सिअस या सरासरी तापमानापेक्षा सुमारे सात अंश सेल्सिअसनं कमी होतं. पृथ्वीवरचं त्याकाळातलं पृष्ठभागावरचं तापमान […]

पालखीचा बदलता प्रवास

राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे. […]

1 22 23 24 25 26 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..