उलघाल स्पंदनांची
साऱ्या प्रश्नांची, उत्तरेच निःशब्दी मौनात रुतलेल्या अव्यक्त भावनां पावित्र्य! भावनांचे बंद पापण्यात निर्माल्याचा गंध गंधाळतो स्मृतींना शांत महासागर अथांग मनांतरीचा प्रतिक्षेत दंग, व्याकुळ प्रीतभावनां झांकोळलेले सावळबाधी नभांगण अव्यक्त! अंतरिच्याच दग्ध वेदनां आता स्पंदनांची, असह्य उलघाल या सांध्यपर्वात तुलाच शोधिताना सांग कसा उमजू अर्थ जीवनाचा मी मग्न तुझ्यात तरी मला कळेना — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. […]