घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)
हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे. […]