आत्मचरित्रकार मधुकर केचे
केचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. […]