ज्येष्ठ अभिनेत्री वसुंधरा पौडवाल
वसुंधरा पौडवाल यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं ते नाटय निकेतनच्या ” भटाला दिली ओसरी ” या नाटकात. मो. ग. रांगणेकर या नाटकाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक. त्यांनीच वसुंधराबाईना रंगभूमीवरील अमिनयाचे पहिले धडे दिले, त्या त्यांना म्हणूनच गुरुस्थानी मानत असत. नाटय निकेतनमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगच्या अभिनयाचा उत्तम विकास झाला. […]