राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले
केळकर संग्रहालय पाहण्यासाठी तास-दोन तासांची सवड काढूनच जावे लागते. तेथे दिवे, अडकित्ते, वस्त्रप्रावरणे, दौती-कलमदाने, दरवाजे, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, बैठे खेळ, पेटिंग्ज, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून, तेथील पंधरा दालनांमध्ये त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. […]