ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे
टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने. […]