बालनाटयाची पुढील दोन दशके (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ३)
रत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली. […]