लेखक जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद
तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली. […]