कोटक महिंद्राचे मुख्य संचालक उदय कोटक
वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले. […]