नवीन लेखन...

कृष्णा व सुदामा

आज दादांचा २४वा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने आज तीन स्त्रियांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातील पहिली आहे, सौ. सुप्रिया शेखर शिंदे! हिने शिल्पकलेत प्रावीण्य मिळवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्प घडवण्यात भारतातील पहिल्या स्त्री शिल्पकाराचा मान मिळवला. […]

‘आलम आरा’ पहिला भारतीय बोलपट

१४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली. […]

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर

नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. […]

भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन

१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले. १९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली.जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते. […]

ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर

रघुनंदन पणशीकर यांनी आपली पहिली व्यावसायिक मैफल १९८४ मध्ये केली होती. त्या वेळी त्यांनी राग भूप सादर केला होता. सिंग बंधूंच्या ‘सूरशृंगार’ या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती. […]

पाय डे

‘पाय’ या आकड्यासाठीचे सांकेतिक चिन्ह म्हणून ग्रीक वर्णमालेतील २४ अक्षरांपैकी १६ वे अक्षर हे ‘पाय’ आणि ते आता ३.१४ किंवा २२/७ या संख्येसाठी जगन्मान्य झालेले आहे. त्यामुळे हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो. […]

ज्येष्ठ नाट्य- चित्रपट अभिनेत्री वत्सला देशमुख

शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या. […]

पैज (संक्षिप्त रूपांतरीत कथा २)

मूळ कथा – द बेट; लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४) : हिंवाळ्यांतील एका मध्यरात्री रावसाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होते. राहून राहून त्यांना वाटत होते की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ती पैज लावायला नको होती. पण आता सुटका नव्हती. ती पंधरा वर्षांपूर्वीची संध्याकाळ व त्यावेळी घडलेल्या गोष्टी रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवत होत्या. त्यांनीच दिलेल्या पार्टीत कशावरून तरी चर्चेला विषय आला होता फांशी बरी की आजन्म कारावास बरा. बऱ्याच जणांचे मत होते फाशीची शिक्षा रद्द व्हावी व केवळ आमरण कारावासाची शिक्षाच ठेवावी. […]

बालनाट्याची ६० वर्ष (बाल रंगभूमी माझ्या नजरेतून लेख – २)

मनोरंजनाबरोबरच सुसंस्कार करणे हे बालनाट्याचे प्रमुख उद्दिष्ट मानले गेले. या दोन दशकांत आलेल्या बालनाट्यांचा ओढा अदभूततेकडे जास्त होता. अधिकांश बालनाट्ये परीकथा किंवा फैंटसीवर आधारित होती. राजा-राणी, राक्षस-परी इत्यादी काल्पनिक पात्रांद्वारे जादू व चमत्कारांच्या साहाय्याने व विनोदी पद्धतीने बालनाट्य सादर करण्याकडे कल होता. वास्तववादी कथा-कल्पना, गंभीर विषय, शोकांतिका यांना बालनाट्यात स्थान नव्हते. […]

जन्माला आलो तर

जन्माला आलो तर मरणं ही ठरलेलं आहे, कुणाचं लवकर जाणं हे विधिलिखित आहे कोण कसं लवकर गेलं ही हळहळ व्यक्त होते, आयुष्य असेल थोडं तर नशीब ही रुसते लहान मोठं वय ह्याचा संबंध मग राहतं नाही, मरणदारी नौका जाणं सत्य मग टळत नाही किती करा टेस्ट आणि किती खा गोळ्या, हृदय बंद पडेल कधी न कळेल […]

1 270 271 272 273 274 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..