नवीन लेखन...

वणवा

आताच दिस आला लगा मिटला मिटला कसं राहू कसं सहु जीव विटला विटला किती राबू घाम काढू सोलवटू या अंगाला परी दिसना कुठंचं एक सबूद ही ओला पेरू काय अन कुठं ओलं नाही ढेकळाला सारं कातळ कातळ पाझर नाही रं मुळाला वणव्यात लाही लाही नाही जाळं शरीराला करपून काळीज ह्ये गेलं मातीला मातीला असे सरतील दिस […]

बालरंगभूमी माझ्या नजरेतून- (भाग १-प्रस्तावना)

१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. […]

रीतसर कांदे पोहे आणि चहा

रीतसर कांदे पोहे आणि चहा जेष्ठ लोकांच्या सोबत भेट ठरते पहा चारचौघात दोघे बघतात एकमेकांना हळूच मोठ्यांच्या समोर नजर भेट होते ती लाजून दोघांना काहीतरी तिथेच क्षणात वाटतं इथेच आपलं जुळाव हे मग जाणवत थोडस दोघांत बोलून भेट ती संपते होकार होतात दोघांत लग्नगाठ मग ठरते आकर्षण स्पर्श ओढ दोघांनाही असते लग्नानंतरचे नवीन दिवस मखमली बहरते […]

मौन जिव्हारी

मला अजूनही कळले नाही तुझ्यात, मीच गुंतलो कसा मनास ध्यास हा नित्य तुझा नकळे तुझ्यात गुंतलो कसा जगी सारी नाती ऋणानुबंधी सत्यसाक्षी, हे अनादिकाली कां? हीच ओढ गतजन्मांची मीच तुझ्यात गुंतलो हा असा वास्तव! आज तसे दुरत्वाचे दुर्भाग्य! भाळी हे प्राक्तनाचे दग्धता ही नां कधी शमणारी तरी तव स्मरणी जगतो असा उरी आर्त ओढ प्रीतभावनांची घनमेघ, […]

अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर

फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’ […]

मनसेचा वर्धापनदिन

२००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. […]

रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)

आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ? […]

पत्रकार अनंत भगवान दीक्षित

वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. […]

फिर वही ‘जाॅय’ लाया हूॅं

‘फिर वही दिल लाया हूॅं’ चित्रपटात, आशा पारेख होती. खांद्यावर गिटार घेऊन, लाल टी शर्ट व पांढऱ्या पॅन्टमधील बागेतून गात चालणारा जाॅय, तरुणींच्या दिलाची ‘धडकन’ झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत. कितीही वेळा ती ऐकली किंवा पाहिली तरी ‘दिला’चं समाधान काही होत नाही. […]

नो स्मोकिंग डे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. […]

1 276 277 278 279 280 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..