सावंत ‘विकी’
विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’! […]