बस्तरचा दशहरा सोहळा (उगवता छत्तीसगड – Part 4)
जगदलपुर मधील धरमपुर भागात उभारलेले विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय (zonal anthropological museum Z.A.M.) म्हणजे छत्तीसगडराज्याच्या मुकुटातील मानाचा तुरा आहे. मानव वंशशास्त्र, त्याचा विकास व संस्कृती शास्त्र या विषयावर आधारीत बस्तर मधील विविध आदिवासी जमातीचा जिवंत वाटणारा इतिहास म्हणजे विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय. ह्या संग्रहालयात आदिवासींचे अनेक पुतळे आहेत. त्याच बरोबर आदिवासींची घरे, त्यांचे दाग दागिने, शेतीची अवजारे, प्राण्यांची शिकार करण्याची आयुधे, शिकार केलेल्या प्राण्यांची डोकी, शिंगे, नदीत चालणाऱ्या होड्या, मासे पकडण्याची अनेक तऱ्हेची आयुधे या सर्व गोष्टी भव्य दालनात काचेच्या कपाटात मांडलेल्या आहेत. […]