विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता
‘दुनिया ने उंढा चष्मा’ या नावाचा त्यांचा मूळ गुजराती स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. स्तंभलेखन, नाट्यलेखनही त्यांनी केले होते. गुजराती रंगभूमीवरही ते लोकप्रिय होते. ‘सब’ वाहिनीने २००८ पासून तारक मेहता यांच्या लोकप्रिय सदरावर आधारित एका मालिकेची सुरुवात केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे एक वेगळीच दुनिया आणि तारक मेहता यांच्या लेखणीतून साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. […]