नवीन लेखन...

प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो. […]

कादंबरीकार व कथा लेखक ह. मो. मराठे

ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. […]

ऐसी दिवानगी

५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरील, बाल्कनीच्या खिडकीतून पडून दिव्या, दूरच्या प्रवासाला निघून गेली. हे तिचं अचानक मृत्यूमुखी पडणं एक न उलगडलेलं, गूढ रहस्यच होऊन राहिलं. […]

लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक

लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंदोर येथे झाला. पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध […]

जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा वर्धापनदिन

कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे. जे. मधील प्राचार्य-संचालक पदाची कारकीर्द (१९१९-३६) विशेष संस्मरणीय ठरली. त्यांच्या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या व त्यामुळे या कलाशाळेचे नाव भारतभर गाजू लागले. १९२० च्या दरम्यान चौथ्या वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी सॉलोमन यांनी प्रत्यक्ष नग्न व्यक्तिप्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ-क्लास’ सुरू केला. त्यामुळे विदयार्थ्यांस शरीरशास्त्राचा प्रत्यक्ष मानवी शरीरावरून अभ्यास करण्याची संधी मिळाली. नग्न व्यक्तिप्रतिमान व त्याच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या अभ्यासाला दिशा व उत्तेजन देण्यासाठी सॉलोमन यांनी भित्तिचित्र-सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) वर्ग सुरू केला (१९२०). […]

एक परीस स्पर्श (भाग – २३)

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता. […]

बस्तर परिसर (उगवता छत्तीसगड – Part 3)

जंगलाचे वरदान असलेला ह्या  बस्तर प्रदेशात अनेक औषधी वृक्षांच्या जाती, विविध प्राणी व पक्षी आढळतात. ह्या सर्वांचा आदिवासीच्या जीवनाशी निगडीत संबंध आहे. बस्तर प्रदेशातील अदिवासींचे  जीवन जंगलावर अवलंबून आहे. बस्तर भागातील आदिवासींच्या मुख्य जमातीची नावे आहेत अबूज मारिया, बायसन  हॉर्न मारिया, भात्र, हलबा, गद्वा, आणि गोंडा. त्यांच्यात अनेक पोटजाती सुद्धा आहेत. विलक्षण किरटया आवाजात गायले जाणारे लोकसंगीत, बायसनचे (गवा) शिंग डोक्यावर बांधून केलेले “काकसर नृत्य” हा आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. […]

महाशिवरात्री विशेष

आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या. […]

अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे

जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली. […]

गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. […]

1 284 285 286 287 288 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..