पृथ्वीचं भावंड
पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लघुग्रह हे काही वेळा ग्रहमालेतील इतर ग्रहांच्या सान्निध्यात येतात व त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात जखडले जातात. […]