नक्षलींच्या दहशती मुळे झालेले निर्वासित (कथा ६)
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेड्यातून ६० एक कुटुंबाना नक्षलवादींनी घराबाहेर काढून देशोधडीला लावलेले आहे. त्यांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेले आहेत. सधन कुटुंबातील मंडळी साधे रोजी पगार मिळणारे कामगार म्हणून जीवन कंठीत आहेत. ६७ वर्षाचे मन्साराम कोले तावातावात आपली कथा सांगत होते “ माझा मुलगा पोलीसात भरती झाला आणी आमच्या घराचे वासेच फिरले.रोज नक्षलवादी वेळी अवेळी […]