भात पुराण
वरण भाताच्या मुदिवर तुपाची धार, पिळायचं लिंबू मग येते बहार. तोंडी लावायला बटाट्याची गोल कचरी, यापुढे पक्वांनांची काय सांगा मातब्बरी?. दहिबुत्ती म्हणजे सांगतो तोंडाला पाणी, भातावर दही, वर जिऱ्या तुपाची फोडणी. ताकातली मिरची तळून कुस्करायची वर, पोह्याचा पापड असेल तर नुसता कहर. नारळी भाताचा स्वाद, दरवळ संपूर्ण घरात, पावलं वळतात अलवार स्वयंपाकघरात. आंबेमोहोर तांदूळ, त्यात नारळ,गूळ […]