बिकट वाटा
अनभिज्ञ बिकट वाटा अगतिक जिद्दी पाऊले ध्येय खंबीर वाटसरूंचे अथक नित्यची चालले वळणेही, वेडी वाकडी अंदाज, सारेच आंधळे साथ अनामिक वाटाडा हातात हात धरुनी चाले साक्षी,स्पर्श त्याचे ग्वाही निःशंक! जगती चालले चराचरी न कुणीही एकटे रूप श्रीचे सोबती चालले हेच अतर्क्य, अगम्य सारे सुखनैव! चिरंजीव राहिले — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ३६. ५ – २ – […]