नवीन लेखन...

ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत. […]

दृष्टांत

सांगा किती किती सावरावे किती समजवावे या मनाला प्रवाहा विरुद्ध, पोहणारा मी कां? विसरू भोगल्या क्षणाला सद्गुणी सहवासातची जगलो जगी अर्थ जगण्याचा उमजला सोबतीला, थवे जरी निंदकांचे दुर्लक्षूनी, मी सावरले स्वतःला विवेके, संयमे या जगी जगावे सांभाळीत साऱ्या मनामनाला दिशाहीन वाऱ्याचेच ते वाहणे पंचमहाभूतांची सोबत सृष्टीला सोहळे, ऋतुचक्रांचेच त्रिलोकी दृष्टांत! ईश्वरी दाविती मानवाला — वि.ग.सातपुते. (भावकवी) […]

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने

त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते. […]

भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ

गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. […]

आलेपाक

साखर आणि आल्याच्या रसापासून केलेले ही वडी बहुगुणी औषधी आहे. पाचक व पित्तनाशक आहे. सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. इतकं स्वस्त औषध उपलब्ध असताना आपण सर्रास महागडी आकर्षक पॅकींगमधली सीरप खरेदी करतो. […]

पर्यावरणपूरक घरांची गरज

पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं. […]

बस्तर ( छत्तीसगड ) नक्षलवाद

अबुजमाड भागात सरकारी यंत्रणाचे अस्तित्व नाहीच.कोणताही रस्ता वा पूल बांधल्यास ते सुरुंग लावून उडवले जातात.माओवादी आपल्या जनता सरकार मार्फत आदिवासी मुलांकरता शाळा चालवतात,तेथे शिक्षक नाहीत मुलांना जेमतेम अक्षर ओळख आणी माओ प्रेमाची गाणी शिकवली जातात. […]

निकाल

माणसाला निकालाची खूपच उत्सुकता असते. कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण सगळ्यात लहानपणापासून एका निकालाची उत्सुकता तर असतेच पण धडधडही असते. […]

गीतांजली

निरागस भावनांची गीतांजली निर्मली, भावफुलांची रंगोली दीपज्योत! अंतरी संवेदनांची निक्षुनी! सुरेल सत्य गुंफलेली सात्विक, प्रीतभाव मनसागरी अलवार प्रसवती शब्द ओंजळी राशी! सुखदुःखांच्याच ललाटी झरझरते भावगंगा ओथंबलेली झाले मुक्तमोकळे, अव्यक्त मन शब्दफुले! कवितेतूनी गुंफलेली काव्यप्रतिभा! वरदान दयाघनी प्रतिभा! जणु प्रांगणी मंतरलेली — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ३४. ३ – २ – २०२२.

ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर

शारदा, सौभद्र, मृच्छकटिक, एकच प्याला, प्रेमसंन्यास, बेबंदशाही, गारंबीचा बापू, लग्नाची बेडी, वेड्यांचा बाजार, रुक्मिणीहरण अशा अनेक एकूण १०० नाटकात घाणेकरांनी भूमिका केल्या आहेत. आचार्य अत्रेंचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘श्यामची आई’ या चित्रपटात मध्येही शंकर घाणेकरांनी काम केले आहे. अशा या नटवर्यला जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी ‘विनोदवीर’ म्हणून गौरविले होते. […]

1 303 304 305 306 307 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..