नवीन लेखन...

राष्ट्रीय विज्ञान दिवस

सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. […]

छत्रपती संभाजीराजे

साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला. […]

संपर्क आणि सहवास

आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार! […]

जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. […]

भारतीय जॅझ संगीताचे पितामह लुईस बँक्स

`मिले सूर मेरा तुम्हारा…’ या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक ॲ‍रेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची. […]

कोणे एकेकाळी घडले रामायण (सुमंत उवाच – 136)

एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात […]

मन रे तू काहे न धीर धरे

एक रोग म्हणून नव्हे तर वृद्धांची मनं. लहानाचे कोंडणे. तरुणांना पेन्शनर सारखे घरात बसून काम करावे लागते पण यात समाधान नाही. आयुष्यातील आंनद लुटायच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जीव तीळतीळ तुटतो. […]

टी-रेक्सची ‘लोक’संख्या

पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता. […]

आत्म्याचे रूप

बिलोरी दिसते प्रतिबिंब तेच कां ? रुपडे आपुले कसा ? शोधावा आत्मा कोणते ? रूप ते आगळे।। माया सारीच दयाघनाची रुपात, साऱ्या तोच एक देही, तो चिरंजीव आत्मा दावितो जगण्याचे सोहळे।। जीव! सृष्टीत या विनाशी कृपावंत! तो जगविणारा जाणावे, त्यालाच निरंतर रूप आपुले त्यात दडलेले।। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र.३३. २ – २ – २०२२.

1 304 305 306 307 308 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..