नवीन लेखन...

आठवा खंड

झिलँडिया खंडाचा पाण्याखालचा थर आणि ऑस्ट्रेलिया खंडाभोवतीचा पाण्याखालचा थर हे स्पष्टपणे वेगवेगळे झालेले असून, ते एका खोल घळीनं विभागले आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटर इतकी खोली असणारी ही घळ ‘कॅटो ट्रफ’ या नावानं ओळखली जाते. […]

आणि शेवट गोड झाला (माझी लंडनवारी – 37)

ईकडे आमच्या ग्रुपने ही मला सेंड ऑफ पार्टी दिली. परत एकदा मन,डोळे भरुन आले. खूप काही मिळालं होतं मला दोन्ही व्हिजिटमधे. माझं आणि शैलेशचं फ्लाईट एकाच दिवशी होतं पण तो आधी पोहचणार होता. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवर तो मला रिसीव्ह करायला होताच. […]

सुखदा लाघवी

डोळे भरूनी, मिटूनी पापणी नीत नीत मी! तुजलाच पहावे उघडिता नयन! तूं सहज लपावे दिसता क्षणभर! तूं हळूच हसावे ।। १।। सुखदा लाघवी! हॄदयी फुलावी ब्रह्मकमळ! ते प्रीतीचे उमलावे हितगुज हे! मनामनांचे उमजावे संचिती प्रितिस या घट्ट बिलगावे ।।२।। उमलता फुले! अंतरी गंधाळावे सजता सृष्टी! सप्तरंगा श्रृंगारावे उपभोगुनी! सोहळे ऋतुऋतुन्चे विरघळूनी प्रितीत! आनंदी जगावे ।।३।। प्रीतफुल […]

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन

शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी  हैदराबाद येथे झाला. शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते […]

शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्य महत्वाचे

आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असे वाटत असले तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण त्यांतच सामावलेले असते. […]

बी. जी. चितळे डेअरीचे संचालक भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे

काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. […]

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ!

नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. येणाऱ्या अडचणींवर कोणता उपाय करायचा हा सल्ला देखील तो आपलेपणाने मालकाला वेळोवेळी देत असतो. […]

व्यक्तित्व म्हणजे निराळे अस्तित्व

प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरे तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय. […]

अकल्पित (भाग – 1)

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, […]

1 307 308 309 310 311 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..