ने मजसि ने (माझी लंडनवारी – 29)
शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले. […]
शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले. […]
२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यांनी केंद्रात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षासाठी कार्यरत आहेत. […]
मनी भाव अंतरी तुमचा ठाव सद्गुरु महाराज तुमचेच नाम २१ अध्याय पूर्ण पारायण होता महाराज तुमची कीर्ती अनादी अनंता गण गण गणात बोते मंत्र प्रभावी चिंता सोडवी सद्गुरुच्या पायापाशी बंकटलालासी तुम्ही प्रथम दर्शन दिले शेगाव नगरी प्रति पंढरपुर झाले प्रत्येक अध्याय वाचता मनोभावे संकट निवारण होतील सहज सारे नसे मागणे महाराज तुमच्यापाशी अज्ञान बालक मी घ्या […]
मी अजूनही तुझ्याच आठवात दंगतो बेजार, प्रीतभावनांनाही कुरवाळीतो मिटलेल्या पापणीतही अस्तित्व तुझे तरीही लोभस चराचरी तुला शोधितो गुलाब, जाईजुई, बकुळ, मोगरा चाफा तुझ्याच स्मृतीतुनी,अजूनही दरवळतो सृष्टीत साऱ्या हिरवळलेले चैतन्य तुझे पाहता, भावनांचा बहार उमाळून येतो अवखळ निर्झर,तुझ्या ओल्या स्मृतींचा माझ्याच भाबड्या अंतरातुनी पाझरतो आज सामोरी झाकोळलेले हे तारांगण तरीही, मी तुझ्याच आठवासंगे जगतो — वि.ग.सातपुते (भावकवी) […]
मला एकटे, जगण्याचा सराव नाही जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो तोल सांभाळणे अजुनी जमले नाही भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी वेदनांची, कधीच फिकीर केली नाही वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी जगतांना, मी कधीच कुरकुरलो […]
कोमेजल्या फुलांचा गंध वाऱ्यावर उडून गेला बाई निर्माल्य झाले सुकून त्याचे कोमेजल्या कळ्या काही दुःख माणसाचे न दिसते कधी केव्हा कुठलेच काही परी दुनिया शिकविते धडे हजार उपदेश रोज करुनी विरल्या भावनांचा निचरा न मोकळा कुठे कधीही गर्तेत गोल फिरतो वारा उडून पाचोळा वेदना सारी मनाच्या कातर वेळा निःशब्द साथ सुटतील कोडी आप्त जातील सोडून सारे […]
आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान शाळेत असताना व्हायचे असे झेंडा वंदन भल्या पहाटेच आम्ही उठून गणवेश घालून पळत पळत ओळीत उभे रहायचे जाऊन मग निघायची मोठीच्या मोठी. प्रभातफेरी पालक उभे रहात कौतुकाने दारोदारी भारतमाता की जय. वंदेमातरम गर्जत असू पालक डोळ्यातील आनंदाश्रू असत पूसू आम्ही पुढे पुढे वेगात तर बाई यायच्या मागे धावत मुलांना […]
उभी कोपऱ्यात शहराच्या, ती वस्ती लाल दिव्याची. अभिशाप भोगत असते, रात्रीच्या अभिसाराची. सकाळ होई दुसऱ्या प्रहरा, शीण कायेचा तो सारा. अंमल वारुणीचा असे अजूनही, वस्त्रांचे भान ते नसे जराही. झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी, कवळिती तयांना छातीशी धरूनी. बिलगती कुस मिळे मायेची, कसर रात्रभराच्या विरहाची. स्नान करूनी हात जोडुनी, देवाला सजविती फुलांनी. करेल काय?निराकार तो ही, चुरगळा […]
सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्या मध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियां सारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन मधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांनी ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडवला. […]
डीके आजोबा ही वल्ली आमच्या आयुष्यात तशी अचानकच आली. डीके हे त्यांचं आडनाव. त्याचं झालं असं, सूर नवा ध्यास नवा हा बालगायकांचा रिऍलिटी शॊ सुरु होता त्याचं चित्रीकरण मीरा रोड इथल्या स्टुडिओत सुरु होतं. एकदा माझ्या एका परिचितांचा फोन आला की तुम्हाला चित्रीकरण पाहायला जायचं असल्यास डीके आजोबा घेऊन जातील. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions