नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ८ )

पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता. […]

एक प्रदीर्घ ‘रात्र’

सातशे दिवसांच्या अंधारानंतर मात्र जवळजवळ पंचाहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट होऊन, मोठे बदल असणारी नवी जीवसृष्टी निर्माण होते. या सातशे दिवसांच्या म्हणजे जवळजवळ दोन वर्षांच्या काळोखानंतर, सूर्यप्रकाश जरी प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याइतका तीव्र झाला असला तरी, जीवसृष्टीची पुनः सुरुवात होण्यास किमान चाळीस वर्षांचा दीर्घ काळ लागतो. […]

अलविदा

हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या […]

नवे? तेही सोनेच! (माझी लंडनवारी – 26)

मग शुक्रवारी रात्री आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा, गाणी, परत शेवटची हाईड पार्कची चक्कर अस करत आम्ही 3-4 वाजता झोपलो. आता उद्या जाण्याचं काही टेन्शन नव्हत. आपलीच मंडळी होती तिथे. […]

अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा

मे १९४७ च्या एके सकाळी, अण्वस्त्र चाचणी झाली. अण्वस्त्राचे सांकेतिक नाव होते, ‘हसरा बुद्ध.’ चाचणी स्थळाचे निरीक्षण करताना इंदिराजी, डॉ. रामण्णा व डॉ. होमी सेठना यांची छबी दुस-या दिवशीच्या दैनिकांमध्ये झळकली आणि डॉ. रामण्णांचे नाव साऱ्या जगात झाले. त्यावर्षीचा भारताचा नागरी सन्मान त्यांना लाभला. […]

हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला. […]

डभईची लढाई (भाग चार)

युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले. […]

भारतातील निसर्ग आणि विश्रांतीची पर्यटन स्थळे

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात. […]

अशी कवीता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ लाघवी कवीता हळूच पाऊली येते मयुरपिसी मखमली मृदुल करांनी अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ।।१।। कदंबतरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते शब्दफुलांच्या या वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते ।।२।। कालिंदीच्या! डोहातूनी त्या सुरेल, ताल सप्तसुरांची येते राधे! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते ।।३।। शब्दशब्द मनी भाव उमलता वास्तव! […]

गणिती शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे उर्फ पां. वा. सुखात्मे

पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता. […]

1 326 327 328 329 330 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..