सूर्याला स्पर्श!
सुमारे सातशे किलोग्रॅम वजनाचा हा पार्कर सौरशोधक १२ ऑगस्ट २०१८ रोजी अमेरिकेतील केप कॅनाव्हेरल इथून अंतराळात झेपावला. हा शोधक आता अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. सूर्याभोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेत हा शोधक सूर्याच्या जवळ येतो व त्यानंतर सूर्यापासून दूर जाऊन शुक्राच्या कक्षेच्या पलीकडे जातो. त्यानंतर तो पुनः सूर्याजवळ येऊ लागतो. […]